New Optimizer & Branding Tool

Showing posts with label story 2. Show all posts
Showing posts with label story 2. Show all posts

Saturday, 16 January 2016

देऊळ बंद निमित्ताने

देऊळ बंद च्या निमित्ताने

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी सांगितल्या पासून "देऊळ बंद " पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती पण पाहण्यासाठी वेळ मिळत नव्हता .
त्यांच्याच कृपेने योग जुळून आला .

प्रत्येक मानवाच्या मनाचा लेखा जोखा म्हणजे देऊळ बंद .
मना मध्ये आस्तिक आणि नास्तिक भाग असतात 'त्याची प्रतीके हि शास्त्रज्ञ आणि भोळा भाविक 'आहेत .

वर करणी आम्ही स्वतःला आस्तिक म्हणवतो पण मनात कुठे तरी विरोध चालूच असतो , "देवा तू हे काय केलेस "

"काय माझ्या आयुष्यात वाढून ठेवलेस "

हे सर्रास वापरण्यात येणारी वाक्ये म्हणजे एक प्रकारे नास्तिकताच ।

देव हा पूर्ण न्यायी आहे आणि योग्य वेळी तो योग्य ते देतोच । योग्य आयोग्य तो जाणतोच ।


हा विश्वास जसा दृढ होत जातो तशी श्रद्धा सबळ होत जाते ।

स्वामी समर्थ ज्या प्रमाणे शास्त्रज्ञा सोबत अडचणी प्रसंगी सतत होते तसेच सद्गुरु तत्व आपल्या बरोबर राहावे अशी आम्हाला सतत इच्छा असते । बापू आम्हाला सांगतात "जर मोठ्या प्रसंगात तो आपल्याला सोबत पाहिजे असेल तर छोटया छोट्या गोष्टीत देखील त्याला बोलवता आले पाहिजे . "

आम्हाला हवी ती मजा करताना तो नको असतो आणि अडचण आली कि हवा असतो । म्हणून आमचा वेळोवेळी घात होतो ।

साई सच्चरितात बाबा हेमाड़पंतांना स्पष्ट विचारतात "चणे खाताना माझी आठवण काढतोस काय ? मला चणे देतोस काय ? "
आपल्या सर्व कृतीमध्ये "त्याला बोलावणे " हीच खरी श्रद्धा आहे ।

अन्यथा आमचा "पासवर्ड हरवलेला शास्त्रज्ञ " होतो ।
आणि असे होऊ नये म्हणून त्याच्या "शब्दात राहणे "
"त्याची आठवण स्मरण करत राहणे "
"त्याला सतत बोलावत राहणे "

हाच खरा "मास्टर पासवर्ड "

मानवाच्या मनातील "देऊळ बंद " होऊ देत नाही ।

Vector Ink - Work Place