Sunday, 17 January 2016

देऊळ बंद2 #नशिबावर चकवा #अनिरुद्ध #पितृवचन

"हातावर नशीब , नशिबावर चकवा  चकाव्यावर मात " असेच काहीसे शब्द शास्रज्ञाला बोलतो एक वाटाड्या अशिक्षित ओल्ड मॅन , वृद्ध गृहस्थ .

साई सच्चरितात 32 व्या अध्यायात वाट हरवलेले चार सुबुद्ध आणि त्यांना प्रेमाने भाकर खाऊ घालणारा अशिक्षित वणजारी आठवल्या वाचून राहात नाहीत.

" क्या ढूंडता है मुसाफिर कांधे पर सवाल लिये . जिसका जवाब दिया है खुदाने खुद साथ रहके "

हे शब्द एका फकिराचे शब्द आमच्या साठी मोलाचे ठरतात .

हातावर नशीब ; आपल्याला हवा असलेला पासवर्ड आमच्या हातावरच असतो . आमाचा मायबाप सखा सद्गुरु पिता आमच्या साठी दर गुरुवारी येऊन आमच्या पुढे उभा असतो . हेच आमचे हातावरचे नशीब .

आणि तरीही आमचे वर्तुळाकार फिरणे चालू राहते @चिन्हासारखे . कोठेही न पोहंचणारे . हाच आमचा नशिबावर चकवा .

चकव्यावर मात फक्त "तो"च करू शकतो कारण "तो" स्वतः त्यासाठीच आलेला असतो म्हणून . आणि त्याचा तो स्वभाव आहे म्हणून .

चकव्यावर मात करण्यासाठी आम्हाला फक्त एक गोष्ट करणे आवश्यक असते , ती म्हणजे त्याचे अस्तित्व स्वीकारणे .


वणजाऱ्याच्या कथेत गुरू " उलटे टांगतात म्हणजेच . ह्या चकव्यावर मात देतात . "
आम्हाला आमचे पाय बांधून घेण्यास विरोध करता कामा नये .

असेच प्रश्न घेऊन दिवस रात्र आम्ही भरकटत राहतो . गोल गोल .

स्वतःला चकवा देत राहतो .

आमच्या गाडीची स्टिअरिंग "त्या"च्या हातात देण्यास आम्ही तयार नसतो .

" हा देहाची नाही जेथे आपुला , तोचि साई चरणी अर्पिला , मग तयाच्या चलनवलनाला काय आपुला अधिकार "

हा संपूर्ण शारण्य भाव आमच्यात निर्माण होत नाही .

जेव्हा बुद्धिमत्तेवर अधिक विश्वास ठेवणाऱ्या  शास्त्रज्ञ मनाला आपण सद्गुरु चरणी समर्पित करू तेव्हा ...

आणि तेव्हाच सर्व कोडे उलगडतात .

सर्व आनंदाच्या राशी घेऊन , सरकारचा खजिना घेऊन तो आमच्या साठीच उभा असतो .

युगे अठ्ठाविस
.
हरी ओम श्री राम अम्बज्ञ .

16 comments:

  1. अप्रतीम..
    आपणच आपले "देऊळबंद" करतो..
    तरीही "तो" येतो व आपल्याला "ते" ऊघडावे लागतेच !

    ReplyDelete
  2. अप्रतिम निशितांतसिंह
    तुझ आहे तुज पाशी परी तु जागा भुललासी अशी गत्यांतर होते आपली

    ReplyDelete
  3. निशिकांतसिंह*

    ReplyDelete
  4. निशिकांतसिंह*

    ReplyDelete
  5. काय गोड गुरू ची शाळा ,
    सुटला जनक जननीचा लळा
    तुटली मोह ममतेची श्रृंखला
    लाधलो अवनीळा मुक्तता
    काय गोड गुरू ची शाळा.

    आपण फक्त एकच् पाऊल पुढे टाकायचे आहे, ९९ पाऊले "त्याने" टाकलेली आहेतच्.

    जय जगदंब जय दूर्गे

    ReplyDelete
  6. काय गोड गुरू ची शाळा ,
    सुटला जनक जननीचा लळा
    तुटली मोह ममतेची श्रृंखला
    लाधलो अवनीळा मुक्तता
    काय गोड गुरू ची शाळा.

    आपण फक्त एकच् पाऊल पुढे टाकायचे आहे, ९९ पाऊले "त्याने" टाकलेली आहेतच्.

    जय जगदंब जय दूर्गे

    ReplyDelete
  7. डॉक्टर निशिकांत.अप्रतिम लेख. श्रीसाईसच्चरितातील ३२ व्या अध्यायाचे उदाहरण खूपच APT आहे. दीक्षित काकांचा भाव " हा देहची नाही जेथे आपुला , तयचिया चरणी अर्पिला , मग तयाच्या चलनवलनाला, काय आपुला अधिकार " हा संपूर्ण शारण्य भाव आमच्यात निर्माण होत नाही तोवर आपला नशिबाचा चकवा चुकत नाही हेच खरे. ह्या चकव्याला चुकविण्याचा एकमेव रामबाण उपाय म्हणजेच आमच्या जीवनरूपी गाडीचे Stering च नव्हे तर सर्वच Control "त्या"च्या हातात देणे!!!

    ReplyDelete
  8. हरी ॐ निशिकांतसिंह एकदा का अध्यात्म कळले की आपल्या देहरूपी देवळास जे दार असते ते अगदी सताड उघडे करायला हवे..

    ReplyDelete
  9. Dr Nishikant just superb lekh. Very nice correlated with shrisaisatcharitra's 32nd adhyay....Deulband's idea(like twitter=idea)= Swami Samarth=Shri Sainath= Sadgurutatva= Aniruddha bapu)
    Would definitely like to know abt Sadgurutatva.
    Thnx.

    ReplyDelete
  10. Shree Ram Ambadnya for all your feedback . Ambadnya.

    ReplyDelete
  11. Shree Ram Ambadnya for all your feedback . Ambadnya.

    ReplyDelete

Vector Ink - Work Place