New Optimizer & Branding Tool

Showing posts with label story 1. Show all posts
Showing posts with label story 1. Show all posts

Sunday, 17 January 2016

देऊळ बंद2 #नशिबावर चकवा #अनिरुद्ध #पितृवचन

"हातावर नशीब , नशिबावर चकवा  चकाव्यावर मात " असेच काहीसे शब्द शास्रज्ञाला बोलतो एक वाटाड्या अशिक्षित ओल्ड मॅन , वृद्ध गृहस्थ .

साई सच्चरितात 32 व्या अध्यायात वाट हरवलेले चार सुबुद्ध आणि त्यांना प्रेमाने भाकर खाऊ घालणारा अशिक्षित वणजारी आठवल्या वाचून राहात नाहीत.

" क्या ढूंडता है मुसाफिर कांधे पर सवाल लिये . जिसका जवाब दिया है खुदाने खुद साथ रहके "

हे शब्द एका फकिराचे शब्द आमच्या साठी मोलाचे ठरतात .

हातावर नशीब ; आपल्याला हवा असलेला पासवर्ड आमच्या हातावरच असतो . आमाचा मायबाप सखा सद्गुरु पिता आमच्या साठी दर गुरुवारी येऊन आमच्या पुढे उभा असतो . हेच आमचे हातावरचे नशीब .

आणि तरीही आमचे वर्तुळाकार फिरणे चालू राहते @चिन्हासारखे . कोठेही न पोहंचणारे . हाच आमचा नशिबावर चकवा .

चकव्यावर मात फक्त "तो"च करू शकतो कारण "तो" स्वतः त्यासाठीच आलेला असतो म्हणून . आणि त्याचा तो स्वभाव आहे म्हणून .

चकव्यावर मात करण्यासाठी आम्हाला फक्त एक गोष्ट करणे आवश्यक असते , ती म्हणजे त्याचे अस्तित्व स्वीकारणे .


वणजाऱ्याच्या कथेत गुरू " उलटे टांगतात म्हणजेच . ह्या चकव्यावर मात देतात . "
आम्हाला आमचे पाय बांधून घेण्यास विरोध करता कामा नये .

असेच प्रश्न घेऊन दिवस रात्र आम्ही भरकटत राहतो . गोल गोल .

स्वतःला चकवा देत राहतो .

आमच्या गाडीची स्टिअरिंग "त्या"च्या हातात देण्यास आम्ही तयार नसतो .

" हा देहाची नाही जेथे आपुला , तोचि साई चरणी अर्पिला , मग तयाच्या चलनवलनाला काय आपुला अधिकार "

हा संपूर्ण शारण्य भाव आमच्यात निर्माण होत नाही .

जेव्हा बुद्धिमत्तेवर अधिक विश्वास ठेवणाऱ्या  शास्त्रज्ञ मनाला आपण सद्गुरु चरणी समर्पित करू तेव्हा ...

आणि तेव्हाच सर्व कोडे उलगडतात .

सर्व आनंदाच्या राशी घेऊन , सरकारचा खजिना घेऊन तो आमच्या साठीच उभा असतो .

युगे अठ्ठाविस
.
हरी ओम श्री राम अम्बज्ञ .

Vector Ink - Work Place