Saturday 16 January 2016

देऊळ बंद निमित्ताने

देऊळ बंद च्या निमित्ताने

सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी सांगितल्या पासून "देऊळ बंद " पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली होती पण पाहण्यासाठी वेळ मिळत नव्हता .
त्यांच्याच कृपेने योग जुळून आला .

प्रत्येक मानवाच्या मनाचा लेखा जोखा म्हणजे देऊळ बंद .
मना मध्ये आस्तिक आणि नास्तिक भाग असतात 'त्याची प्रतीके हि शास्त्रज्ञ आणि भोळा भाविक 'आहेत .

वर करणी आम्ही स्वतःला आस्तिक म्हणवतो पण मनात कुठे तरी विरोध चालूच असतो , "देवा तू हे काय केलेस "

"काय माझ्या आयुष्यात वाढून ठेवलेस "

हे सर्रास वापरण्यात येणारी वाक्ये म्हणजे एक प्रकारे नास्तिकताच ।

देव हा पूर्ण न्यायी आहे आणि योग्य वेळी तो योग्य ते देतोच । योग्य आयोग्य तो जाणतोच ।


हा विश्वास जसा दृढ होत जातो तशी श्रद्धा सबळ होत जाते ।

स्वामी समर्थ ज्या प्रमाणे शास्त्रज्ञा सोबत अडचणी प्रसंगी सतत होते तसेच सद्गुरु तत्व आपल्या बरोबर राहावे अशी आम्हाला सतत इच्छा असते । बापू आम्हाला सांगतात "जर मोठ्या प्रसंगात तो आपल्याला सोबत पाहिजे असेल तर छोटया छोट्या गोष्टीत देखील त्याला बोलवता आले पाहिजे . "

आम्हाला हवी ती मजा करताना तो नको असतो आणि अडचण आली कि हवा असतो । म्हणून आमचा वेळोवेळी घात होतो ।

साई सच्चरितात बाबा हेमाड़पंतांना स्पष्ट विचारतात "चणे खाताना माझी आठवण काढतोस काय ? मला चणे देतोस काय ? "
आपल्या सर्व कृतीमध्ये "त्याला बोलावणे " हीच खरी श्रद्धा आहे ।

अन्यथा आमचा "पासवर्ड हरवलेला शास्त्रज्ञ " होतो ।
आणि असे होऊ नये म्हणून त्याच्या "शब्दात राहणे "
"त्याची आठवण स्मरण करत राहणे "
"त्याला सतत बोलावत राहणे "

हाच खरा "मास्टर पासवर्ड "

मानवाच्या मनातील "देऊळ बंद " होऊ देत नाही ।

3 comments:

  1. खरचं... देऊळ बंध बघताना आपल्या स्वतःला आलेल्या सदगुरुत्त्वाविषयीच्या अनुभवांची मनात रांग लागते. आधी अनेकदा खुणा त्या त्या वेळेला क्लिक होत नाहीत, मात्र त्याची योग्य वेळ आल्यावरच आपल्या लक्षात येतात. हे पासवर्ड सर्व तीर्थक्षेत्र पुर्ण झाल्यावरच स्वामींनी आठवून दिला. प्रारब्ध...त्याची योग्य वेळ...त्या प्रारब्धांवरचा योग्य मार्ग जाणणारे... फक्त सदगुरुत्त्वच असते, ह्याची खात्री "देऊळ बंद" पाहताना आला.

    ReplyDelete
  2. डॉक्टर निशिकांत. खूपच छान मांडणी. श्रीसाईसच्चरितात बाबा हेमाड़पंतांना स्पष्ट विचारतात "चणे खाताना माझी आठवण काढतोस काय ? मला चणे देतोस काय ? " आपल्या सर्व कृतीमध्ये "त्याला बोलावणे " हीच खरी श्रद्धा आहे. हे उदाहरण येथे समर्पकरीत्या मांडले आहेत.
    माणसाने आपल्या बुध्दी चातुर्यावर भले ही प्रत्यक्ष देऊळ बंद केले तरी मानवाच्या मनातील अल्पशा का होईना श्रध्देचे "देऊळ बंद "
    "तो" अकारण कारूण्याचा महासागर, कृपासिंधु कधीच बंद होऊ देत नाही । ह्याचे अप्रतिम चित्रण म्हणजे "देऊळ बंद " हा सिनेमा!

    ReplyDelete
  3. डॉक्टर निशिकांत. खूपच छान मांडणी. श्रीसाईसच्चरितात बाबा हेमाड़पंतांना स्पष्ट विचारतात "चणे खाताना माझी आठवण काढतोस काय ? मला चणे देतोस काय ? " आपल्या सर्व कृतीमध्ये "त्याला बोलावणे " हीच खरी श्रद्धा आहे. हे उदाहरण येथे समर्पकरीत्या मांडले आहेत.
    माणसाने आपल्या बुध्दी चातुर्यावर भले ही प्रत्यक्ष देऊळ बंद केले तरी मानवाच्या मनातील अल्पशा का होईना श्रध्देचे "देऊळ बंद "
    "तो" अकारण कारूण्याचा महासागर, कृपासिंधु कधीच बंद होऊ देत नाही । ह्याचे अप्रतिम चित्रण म्हणजे "देऊळ बंद " हा सिनेमा!

    ReplyDelete

Vector Ink - Work Place