Tuesday 1 January 2019

HOW TO REMEMBER AARATIES ? (Marathi)

आपले लाडके सदगुरु श्री अनिरुद्ध बापू आम्हांला वर्षानुवर्षे सांगत आहेत की आरत्या पाठ करा .त्यामुळे आम्हाला आमच्या पूजनाकडे जास्त लक्ष देता येईल . भक्ती भावामध्ये रममाण होण्यास मदत होईल .

पण का कोणास ठाऊक, आम्ही आरती पाठ करत नाही . किंवा प्रयास केल्यास पाठ होत नाही.

म्हणून आरती कशी पाठ करता येऊ शकते ह्याची एक ट्रिक , एक पद्धत मी DISCUSS करत आहे.


उदाहरणार्थ मी आरती साईबाबा ही सदगुरु श्री साईनाथांची आरती ( जी श्री साईसच्चरित ग्रंथामध्ये ,अध्याय ३३मध्ये  देखील उपलब्ध आहे ).ही आरती श्रेष्ठ श्रद्धावान माधवराव अडकर यांनी लिहलेली आहे.

Courtesy https://www.sai.org.in/en/aarties
sy :- https://www.sai.org.in/en/aarties
You can download and listen to aaraties from official website (above link) . here we are using this Aarati for educational propose only.



आरती आम्ही का विसरतो ?
आम्ही बऱ्याच वेळा आरती विसरत नाही . एक कडवे घेतले की आता दुसरे कडवे कोणते (कडवे=Stanza) हे पटकन क्लिक होत नाही आठवत नाही .

आम्ही हे का विसरतो ?
आमच्या मेंदूच्या सवयीमुळे . प्रत्येक ओवी च्या शेवटी धृपद येते . जसे इथे " आरती साई बाबा " .
जेव्हा आपण धृपद म्हणतो तेंव्हा दोन गोष्टी होतात. एक - आपले मन त्या धृपदामध्ये रमून जाते . हरवते.
आणि दुसरे म्हणजे आमच्या मेंदुलाकुठेतरी असे वाटते की धृपद आले म्हणजे आरती संपली . पण प्रत्यक्षात आरती पुढे चालूच असते . मग मेंदू अलर्ट / जागरूक होऊन पुढील कडवे (Stanza) शोधू लागते .

कळलं . मग लक्षात कसे ठेवायचे ?
आम्हाला पूर्ण आरती होऊ पर्यंत सतर्क राहणे आवश्यक आहे.
आरतीच्या दोन कडव्यांमध्ये काहितरी संबंध (connections) मनातून निर्माण करून आपण आरती लक्षात ठेवू शकतो. ती method पद्धत आपण नंतर पाहूया.

या ठिकाणी आपण जी पद्धत वापरणार आहोत ती आहे "शब्द संकेत " अर्थात Acronyms Method.

आपण एक वाक्य निर्माण करणार आहोत . प्रत्येक जण आपापल्या आवडीनुसार वाक्य निर्माण करू शकतो.
या वाक्यातील प्रत्येक शब्द किंवा शब्दसमुह आरती मधील एक एक कडवे दर्शवितात.

जाळती प्रारब्ध जया मनी तुमचे नाव .कलियुगातील गुरुवारी निजद्रव्यठेवा- तुझ्या चरणांची सेवा  मी इच्छितो.
आता हे वाक्य मात्र आम्हाला तोंडपाठ झालेच पाहिजे .
ह्या वाक्यामधील रंगीत शब्द आणि शब्द समूह आरती मधील एक एक कडवे दर्शवितात .
उदा:- जाळती प्रारब्ध - जळुनियां अनंग । स्वस्वरूपी राहे दंग ....
इच्छितो :- इच्छित दीन चातक । निर्मल तोय निजसुख ...


अशा पद्धतीने नियमित पणे आरती केल्यास आरती पुस्तिकेची गरज उरणार नाही .

सर्व श्रद्धाभाव मित्रांना शुभेच्छा (ALL THE BEST).

आपले विचार , सूचना कृपया कंमेंट बॉक्स मध्ये लिहा।
त्यामुळे लेखामध्ये सुधारणा करण्यास मदत मिळेल .

।।हरि ॐ।। श्री राम ।। अंबज्ञ ।।
।। नाथसंविध ।।
- डॉ. निशिकांतसिंह विभुते


1 comment:

  1. Ambadnya for sharing. Really helpful to remember aartis

    ReplyDelete

Vector Ink - Work Place