लहान असताना आम्ही ऐकायचो की पाश्चात्य देशात लोक excitement "काहीतरी भन्नाट करतोय" अशा भावाने आत्महत्या करतात . ऐकून बरच विचित्र आणि 'अशक्य कोटीतील गोष्ट' वाटायची.
आज अशी वेळ समोर आलेली आहे की ह्या अशा अशक्य गोष्टी देखील आमच्या समोर भयंकर रूप धारण करून उभ्या राहत आहेत.
त्यातीलच एक उदाहरण म्हणजे ब्लू व्हेल सुसाईड चॅलेंज " गेम.
ह्या गेमच्या आहारी रशिया आणि अमेरिकेतील शेकडो मुलं बळी गेले आहेत. एखादा खेळ इतका घातक असेल असा विचार देखील आमच्या मनाला शिवला नव्हता. पण आपल्या भारतातील मुलं देखील ह्याला बळी पडू लागली तेव्हा आमची झोप खाडकन उडाली . अजूनही कोणी झोपेत असेल तर आत्ताच जागे होणे अत्यावश्यक आहे!!
आमच्या मुलांच्या रक्षणासाठी आम्हालाच कमर कसली पाहिजे .
बऱ्याचवेळा अशा पद्धतीच्या थरारक बातम्या आपल्या समोर आल्यानंतर त्या गोष्टी आपल्यापासून खूपच दूर आहेत असे आपल्याला वाटते.पण खरे पाहता ह्या गोष्टी आपल्यापासून जास्त दूर नसतात आम्हालाही सतर्क राहण्याची तेवढीच आवश्यकता असते .
जेव्हा अशी घटना घडते तेव्हा आपण विचार करतो :-
अशी घटना का घडत असेल?
त्याचबरोबर असे खेळ मुलांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचत असतील ?
मुलांना ते खेळ खेळावेसे का वाटत असतील ?
अने त्या खेळाबद्दल त्याचे दूरगामी परिणाम मुलांना कसे काय कळत नसतील?
असे विविध प्रश्न आपल्या मनात उमटतात
विज्ञानाचे नवीन नवीन शोध आम्हाला नवीन नवीन फायदे मिळवून देतात .
आणि नजिकच्या काळात
त्यात सगळ्यात मोठी क्रांतिकारी घटना म्हणजे स्मार्टफोन. स्मार्ट फोन आल्यापासून लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच इंटरनेटची चटक लागलेली आहे .
अशा वेळेस मोठी माणसं दिवस-रात्र social media whatsapp facebook twitter वरती काही ना काही मेसेज अथवा कॉपी-पेस्ट करत असतात .
दुसरीकडे मुलांच्या हातामध्ये स्मार्टफोन आणि internet कसे येऊन थांबतात याबद्दल पालकांनी स्वतः विचार करायला हवा.
बऱ्याच वेळा पालकांना रिकामा वेळ हवा असतो तेव्हा मुलांच्या हातामध्ये असे स्मार्टफोन आयपॅड मोबाईल गेम्स दिली जातात आणि यातूनच मुलांना अशा गोष्टींची चटक लागते .
आपली मुलं मोबाईल मध्ये काय बघतात ,काय वाचतात ,कोणासोबत संपर्क करतात याबद्दल पालकांना माहिती असायलाच हवी.
त्यासोबतच मुलांना पालकांनी विश्वासात घेऊन अनोळखी माणसांसोबत बोलणे गेम खेळणे किती धोकादायक हे समजावले पाहिजे .
मुलांच्या विविध माध्यमातून विविध माहिती नकळत पणे कानी येऊन पडते . त्यातून आकर्षण आणि कुतूहल निर्माण होऊन , पाय घसरतो . पण येथे पाय घसरण्याची किंमत 'आपले जीवन' आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.
....
पुढील भागात पाहूया
*आत्मविश्वास कमतरता आणि ब्लु व्हेल
*ब्लु व्हेल आकर्षण आणि आम्ही दिलेले संस्कार
*ब्लु व्हेल आणि लक्ष्याचा अभाव
....
Dr Nishikant Vibhute
--
No comments:
Post a Comment